मधमाशा पालन योजना
मध केंद्र योजना
महाराष्ट्र शासन निर्णय क्र. – के. व्ही. बी. -2017 प्र. क्र.16/उद्योग 6 दिनांक 18 जून 2019 रोजी मधकेंद्र योजना ( मधमाशा पालन ) संपूर्ण राज्यात राबविण्याकरता मान्यता दिलेली आहे.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, उद्योग भवन शिवाजी नगर नांदेड शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला मध महाबळेश्वर येथे प्रोसेसिंग व प्रयोगशाळा तपासणी करून मध पॅकिंग करून विक्री केला जातो.
योजनेची वैशिष्ट्य
1. मधमाशा संरक्षण व संवर्धनासाठी जनजागृती व प्रसार प्रचार
2. निशुल्क प्रशिक्षण व कौशल्य विकास
3. 50% अनुदानावर मध उद्योग साहित्य वाटप
4. उप उत्पादने तयार करणेसाठी विशेष प्रशिक्षण
5. मंडळाने निश्चित केलेल्या दराने आवश्यकतेनुसार मध व मेण खरेदीची हमी
6. विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा
योजने मधील घटक
1. मधपाळ ( प्रत्येकी 10 पेट्या )
पात्रता
1. अर्जदार साक्षर असावा. 18 वर्षा वरील वय असावे
2. प्रगतीशील मधपाळ ( प्रत्येकी 50 )
पात्रता
1.किमान 10 वी उत्तीर्ण. 21 वर्षावरील वय असावे.
2. किमान एक एकर शेतजमीन स्व मालकीची किंवा कुटुंबातील इतर व्यक्तीच्या मालकीची किंवा भाडे तत्वावर उपलब्ध असावी.

