नांदेड कृषी-धान्य महोत्सव २०२६
महाराष्ट्र शासन कृषी विभाग- जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय आणि ATMA यांच्या संयुक्त विद्यमाने

मा. मंत्री व पालकमंत्री – मा. ना. श्री. अतुलजी सावे
“नांदेड कृषी महोत्सव हा शेतकरी, महिला बचत गट आणि ग्रामीण उद्योजकांना सक्षम बनविणारा आदर्श उपक्रम आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, व्यावसायिक मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण बाजारपेठ मिळेल. तसेच, श्री. दत्तकुमार काळसायत , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेडयांच्या पुढाकाराने तयार केलेले www.NandedKrushiMahotsav.in डिजिटल व्यासपीठ शेतकऱ्यांना वर्षभर उत्पादनांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची संधी देईल. हा उपक्रम जिल्ह्यातील कृषी विकासाला निश्चितच नवी गती देईल, अशी माझी हार्दिक शुभेच्छा आहे।”

मा. जिल्हाधिकारी – मा. श्री. राहुल कर्डिले (IAS)
“नांदेड जिल्ह्यातील शेतकरी, महिला बचत गट आणि कृषी उद्योजक यांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी आयोजित नांदेड कृषी महोत्सव हा केवळ तीन दिवसांचा कार्यक्रम नसून, शाश्वत विकासाची दिशा दर्शवणारा उपक्रम आहे. या महोत्सवातून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, व्यवसाय संधी आणि थेट बाजारपेठाशी संपर्क मिळतो. यासह www.NandedKrushiMahotsav.in या डिजिटल व्यासपीठामुळे शेतकऱ्यांना सतत चालणारी बाजारपेठ उपलब्ध होईल, अशी माझी शुभेच्छा आहे।”

मा. दत्तकुमार काळसायत , मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड
“कृषी-धान्य महोत्सव या कार्यक्रम अंतर्गत शेती तज्ञ, शास्त्रज्ञ, शेतकरी, महिला बचत गट, उद्योजक व गाहक यांच्यात थेट संवाद साधण्याचे, नवकल्पना सादर करण्याचे आणि उत्पादनांना सतत चालणारी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे एक प्रेरणादायी व्यासपीठ आहे. या उपक्रमासह www.NandedKrushiMahotsav.in या डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षभर उत्पादनांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळेल हा विश्वास आहे।”
स्टॉल नोंदणी करा | Register Stall Now
आपला स्टॉल नांदेड कृषी महोत्सव २०२६ मध्ये दाखल करा.
नोंदणीसाठी ईमेल आणि पासवर्ड वापरून खाते तयार करा, नंतर लॉगिन करून स्टॉल नोंदणी पूर्ण करा.
शेतकरी, उत्पादक आणि ग्राहकांपर्यंत थेट पोहोच मिळवा.
सर्व स्टॉल्स पहा | View All Stalls
सर्व स्टॉल्स, उत्पादने आणि कृषी सेवांची सविस्तर माहिती येथे पहा.
उत्पादन आणि स्टॉल प्रकार नुसार सहज शोधू शकता. थेट फोन किंवा WhatsApp लिंकद्वारे स्टॉलशी संपर्क साधण्याची सोयही उपलब्ध आहे.
About the Festival | महोत्सवाबद्दल
क्रषी-धान्य महोत्सव नांदेड २०२६
शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीसाठी १००+ स्टॉल्स,
शेतकरी‑शास्त्रज्ञ संवाद, शेत माहीती तंत्रज्ञान, तज्ज्ञांचे मार्गदर्शन.
दिनांक: १५ ते १७ मार्च २०२६
स्थळ: नवा मोंढा, कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान, नांदेड
वेळ: सकाळी १० ते रात्री ८
Highlights / वैशिष्ट्ये:
थेट शेतकरी‑ग्राहक व्यवहार
उत्पादन प्रदर्शन आणि विक्री
कृषी तंत्रज्ञान व मार्गदर्शन
संवाद व शास्त्रज्ञांचे सल्ले
कृषी महोत्सव बातम्या, माहिती, घडामोडी व अपडेट्स
🌾🚜 सुवर्णसंधी! नांदेड कृषी महोत्सव २०२६ साठी स्टॉल नोंदणी सुरू 🚜🌾आपला स्टॉल लावा – आपली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवा!
🌾🚜 सुवर्णसंधी! नांदेड कृषी महोत्सव २०२६ साठी स्टॉल नोंदणी सुरू...
Read More🌾 कृषी तंत्रज्ञान आणि नवकल्पना – शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन 🌾
🌾 कृषी तंत्रज्ञान आणि नवकल्पना – शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन 🌾 नांदेड...
Read More🌾 शेतकरी ते ग्राहक थेट विक्री – कृषी महोत्सवाची विशेष संधी 🌾
🌾 शेतकरी ते ग्राहक थेट विक्री – कृषी महोत्सवाची विशेष...
Read More🌾 कृषी महोत्सवासाठी स्टॉल नोंदणी सुरू – आपला स्टॉल आजच नोंदवा 🌾
🌾 कृषी महोत्सवासाठी स्टॉल नोंदणी सुरू – आपला स्टॉल आजच...
Read More
